‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ : गोंधळवणारा, सैरभैर करणारा, तरीही फुकाच्या मिरवण्याला महत्त्व देणारा कालखंड
या कथा आजच्या डोळस लेखकाच्या आहेत. लेखनात प्रयोग करण्यासाठी लागणारी सर्जनशीलता त्याच्याकडे आहे. पण लेखकाला जे सांगायचं आहे ते प्रयोगांमध्ये कुठेच झाकोळून जात नाही हे विशेष. केवळ प्रयोगात अडकून राहणं टाळणारी वस्तुनिष्ठता असल्यानं बालाजी सुतार यांच्या कथा निश्चितच आश्वासक ठरतात. शीर्षकात अस्वस्थ शब्द नसला तरी दोन शतकांच्या मध्यावरचा तो सांधा आणि त्यावरची माणसं अस्वस्थ आहेत.......